E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध केलेले आरोप महिलेकडून मागे
Wrutuja pandharpure
28 May 2025
‘शक्तिशाली’ लोकांकडून दबाव आल्याचा विरोधकांचा आरोप
मुंबई
, (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आणि फसवणुकीचा आरोप करून नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली होती. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आरोप करणार्या महिलेने काही तासांत घुमजाव करत सर्व आरोप मागे घेतली. हे आमच्यातील वैयक्तिक प्रकरण आहे, कोणीही त्याचे राजकारण करू नये, असे सांगत त्या महिलेने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिलेवर राजकीय दबाव आणून माघार घ्यायला लावल्याचा आरोप करत विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. सिद्धांतने लग्न करण्यासाठी दबाव आणला. आत्महत्येची धमकी दिली. डोक्याला गोळी मारण्याचे आणि हाताला ब्लेडने कापण्याचे छायाचित्र त्याने तिला पाठवले. तिला इमोशनली ब्लॅकमेल केल्याचा आरोप संबंधित महिलेचा असल्याचे तिच्या वकिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सिद्धांतने महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. ती लग्नाला तयार नसताना दबाव आणून तिला पहिल्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. आणि महिन्याभरापूर्वी त्याने एका दुसर्याच मुलीबरोबर लग्न केल्याचे छायाचित्र तिला पाठवले, असे त्यांनी सांगितले. सिद्धांतविरोधात डिसेंबर २०२४ मध्ये पोलिस तक्रार करण्यात आली. परंतु, त्यावर कारवाई झालेली नाही. या तक्रारीची प्रतही आमच्याकडे आहे. मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा दबाव आणून काहीही कारवाई केली नाही.
३० तारखेला महिला अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत. लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे संजय शिरसाट गोत्यात आले होते. परंतु, दुपारी तक्रारदार महिलेने घुमजाव करत सगळे आरोप मागे घेतले.
Related
Articles
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली
31 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
27 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली
31 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
27 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली
31 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
27 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतही लादणार अमेरिकन वस्तूंवर कर
28 May 2025
पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली
31 May 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
27 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट